१८ ऑगस्ट २०२४
नाशिकच्या मनमाड परिसरात पावसाने अवकृपा दाखवले असले तरी दिंडोरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पालखेड धरण समूहातील धरणाच्या पाणीसाठ्यात कमाली वाढ झाली असून,पालखेड डाव्या कालव्यातून सुरू असलेल्या पूर पाणी पालिका प्रशासनाने पूर्ण क्षमतेने पाणी उचलले. पालिकेच्या पाटोदा साठवणूक तलाव व वाघदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
त्यामुळे तूर्तास मनमाडला दिलासा मिळाला आहे. भर पावसाळ्यातही महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होणाऱ्या मनमाड शहराला पुढील चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.पाटोदा येथून चार विद्युत पंपाद्वारे वाघदर्डी धरणात पाणी लिफ्ट करण्यात येत आहे.
Copyright ©2024 Bhramar