मनमाड (नैवेद्या बिदरी) :- शहराचे पाणीटंचाई हे राज्यातच नव्हे तर देशभरात परिचित आहे.त्यातच मनमाड शहरात मध्य रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक असून लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्या मोठ्या प्रमाणात अवागमन होतात. यामुळे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते.या पाणीटंचाईचा सामना प्रवासी रेल्वे गाड्यांना आणि स्थानकातील प्रवाशांना सहन करावा लागतो.
याच अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेल्वे वॅगने पाणी आणून येथील फिल्टर हाऊस मध्ये खाली करून रेल्वे स्थानक आणि प्रवासी रेल्वे गार्डनमध्ये पाणीपुरवठा करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले असले तरी याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मात्र अचानक मनमाड रेल्वे स्थानकात पाण्याचे रेल्वे वॅगन रेल्वे आल्याने चर्चेला उधाण आले होते.
उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकाची ओळख आहे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकातून दररोज ११५ होऊन अधिक रेल्वे गाड्या आवागमन करतात यामुळे स्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात असते.
मात्र मनमाड शहराची पाणीटंचाई सर्वस्त्रोत आहे. या अनुषंगाने भविष्यात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाल्यास मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर त्याच्या झळा बसू नये, प्रवाशांना पाणीटंचाई जाणू नये आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी मनमाड जंक्शन स्थानकात विशेष जलवाहिनी करण्यात आली असून भुसावळ येथून प्रायोगिक तत्त्वावर खास रेल्वे गाडीने दोन वॅगनमध्ये १ लाख ४० लिटर पाणी आणून प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यात आली.मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
