सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात 4 तासांच्या थरारा नंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
विलास राजाराम हारक यांच्या घरात कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या गेला होता. विलास हारक यांनी प्रसंगावधान दाखवत घराचे दरवाजे बंद करून बिबट्याला घरातच बंद केले. रात्री 10.30 ते 2.30 चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभाग व शिवडे ग्रामस्थाच्या मदतीने बिबट्या जेरबंद झाला.
ही घटना समजताच सिन्नरचे रिजनल फॉरेस्ट ऑफिसर हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल तांबे, वनमजूर बाबुराव सदगीर, रमेश कवटे सर्पमित्र निखिल वैद्य यांच्या उपस्थितीत बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू केले.