पेठ - तालुक्यातील हरणगांव येथील शेतकरी रविंद्र वामन गावित (३३) हे आज ( दि.२७) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास वडबारी शिवारात आपल्या शेतात जनावरे चारत असतांना सभोवतालीच असलेल्या ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून हल्ला करत दुर अंतरावर ओढत नेले शरीराचे लचके तोडले यात रविंद्र याचा मृत्यु झाला.
दुपारी रविंद्र जेवन करण्यास घरी आला नाही म्हणून घरच्या मंडळींनी त्याची शोधात केली असता शेता लगतच एका अडगळीच्या ठिकाणी लचके तोडलेल्या छिन्नविछिन्न अस्वस्थतेत रविंद्रचा मृतदेह मिळुन आला.
याबाबत दिडोंरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहीती कळवुन वन अधिकारी कर्मचारी व पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात आणुन शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या परिसरात बिबट्या मादी व तिचे दोन बछडे असल्याची चर्चा आहे त्यामुळे या घटने नंतर याठिकाणी तात्काळ वनविभागाने पिंजरा लावुन सदरील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरीकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडे केली.
यावर आजच पिंजरा मागवून लावला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.