बिबट्याचा संचार, मनमाडकर भयभीत..
बिबट्याचा संचार, मनमाडकर भयभीत..
img
दैनिक भ्रमर
मनमाड : प्रतिनिधी शहरातील बुधलवाडी, दरगुडे वस्ती परिसरात बिबट्याच्या संचार दिसून आल्याने नागरिक भयभीत झाले आहे. दरम्यान दरगुडे वस्ती परिसरात बिबट्याने एका कुत्र्याची अर्धवट शिखर केल्याची घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात अंकाई किल्ला, कातरवाडी भागातील जंगलात असलेले पाणवठे सुकून जातात. अन्न व पाण्याच्या शोधात वन्यजीव शहराकडे येण्याच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी माकडे मनमाड शहरात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता बिबट्याचा वागदर्डी धरण जवळील वन खात्याच्या नर्सरी परिसरात व शहरातील बुधलवाडी, दरगुडे वस्ती भागातील नाल्यासह पांझण नदी क्षेत्रात बिबट्याचा वावर दिसून आला.

बिबट्याने एका कुत्र्याची अर्धवट शिखर केल्याची घटनाही आढळून आले. येवला वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली असता. या भागात बिबट्याच्या पायांचे ठसे असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. दोन्ही ठिकाणी एकच बिबट्या असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दरगुडे वस्ती जवळ पिंजरा लावला आहे. येवला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या परिसरात जनजागृती केले असून रात्री बे रात्री बाहेर न पडणे. खास करून लहान मुलांना बाहेर न सोडणे. त्यांची काळजी घेणे आदि सूचना केले आहेत. एक दोन दिवस बिबट्याच्या हालचालीवर वन अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group