धावत्या रेल्वेत तरुणीशी तिकीट परीक्षकानेच केले गैरवर्तन...
धावत्या रेल्वेत तरुणीशी तिकीट परीक्षकानेच केले गैरवर्तन...
img
दैनिक भ्रमर
मनमाड प्रतिनिधी  : प्रवासी रेल्वे गाडीत चोरीच्या आणि किरकोळ वाद झाल्याचे घटना नेहमीच ऐकत असतो. मात्र धावत्या प्रवासी गाडीत चक्क तिकीट परीक्षकानेच एका तरुणीला छेडल्याचे प्रकार समोर आल्याने प्रवासी वर्गासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात धावत्या रेल्वेत तरूणीशी केलेल्या गैरवर्तन प्रकरणी संबंधित तिकीट परीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,गाडी क्रमांक ०६५३० गोरखपूर - बंगळुरू विशेष प्रवासी रेल्वे गाडीने कानपुरहून पुण्याला जाण्यासाठी फिर्यादी प्रवास करीत होते. दरम्यान फिर्यादीचे तिकीट हे आरएसी असल्याने तिकिट परीक्षक तिवारी यांच्याकडे सीट उपलब्धतेबाबत विचारणा केली असता सुरुवातीला गाडीतील बी-४ कोचमध्ये बसण्यास सांगण्यात आले, मात्र नंतर पुन्हा गाडीतील ए-१ कोचमधील ०५ नंबर सीट दिली.

दरम्यान तिकिट परीक्षक तिवारी हे फिर्यादीच्या सीटवर येऊन बसले आणि तिला झोपण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांनी तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. सुरुवातीला चुकून झाल्याचे समजून तिने दुर्लक्ष केले, मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा तिच्या जवळ येऊन बॅड टच केला. घाबरून ती वॉशरूममध्ये २० ते २५ मिनिटे बसून राहिली. बाहेर आल्यानंतर तिवारी वॉशरूमच्या बाहेर उभे असलेले दिसले, यामुळे फिर्यादिला भीती वाटली.ही संपूर्ण घटना फिर्यादीने तिच्या वडिलांना फोनवर सांगितली.

भुसावळ रेल्वे स्थानक येण्याच्या आधीपर्यंत तिवारी यांनी फिर्यादीचे पाठलाग करत सतत गैरवर्तन केले. या प्रकरणी फिर्यादीने मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले असून सदरील गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group