कोल्ह्याची दहशत ! . आतापर्यंत ११ जण जखमी ; कुठे घडली घटना ?
कोल्ह्याची दहशत ! . आतापर्यंत ११ जण जखमी ; कुठे घडली घटना ?
img
Nandini khandare More


कोल्ह्याच्या  दहशतिची एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कागल तालुक्यात कोल्ह्याची दहशत वाढली आहे. घराच्या परसात खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या बालकावर कोल्ह्याने हल्ला केला. यामध्ये शर्विल संजय चव्हाण जखमी असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कागल तालुक्यातील बोरवडे ते मालवेदरम्यान मगदूम वसाहत येथे संजय चव्हाण यांचे घर आहे. गुरुवारी सायंकाळी चव्हाण हे पत्नीसह घराच्या परिसरात काम करत होते. तेव्हा मुलगा शर्विल हा जवळच खेळत होता. अचानक एक कोल्हा आला आणि त्याच्या उजव्या पायाचा चावा घेतला.

या घटनेनंतर शर्विलला तातडीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या कोल्ह्याने परिसरातील मालवे, सरवडे या गावांत देखील दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत 11 लोकांना जखमी केले आहे. या कोल्ह्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group