धक्कादायक ! चक्क डिझेल नाही म्हणून गर्भवतीला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं
धक्कादायक ! चक्क डिझेल नाही म्हणून गर्भवतीला रुग्णवाहिका नाकारली, बाळ पोटातच दगावलं
img
Nandini khandare More
देशात सध्या इंधनाच्या वाढत्या दरांमुळेसर्व सामान्यांची तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे देशात इंधनसाठा आणि पुरवठा कमी नाही असं राजकारणी सांगत असतानाच हिंगोलीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.  दरम्यान ,आता  हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. खासगी रुग्णवाहिका घेऊन त्यात 800 रुपयांचं डिझेल भरून अखेर महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आलं परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार , महिला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने तिचं बाळ पोटातचं दगावल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेच्या नातेवाईकांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसल्याची भावना व्यक्त होत आहे.

 नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशानाणे डीझेल नसल्याच कारण देत गरोदर मातेला रुग्ण वाहिका नाकारली होती. प्रायव्हेट वाहिकेतुन हिंगीलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले, मात्र उशीरा पोचल्याने आईच्या पोटात बाळ दगावल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे एकच खळबळ माजली असून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

आमच्या पेशंटला रुग्णालयात हलवायचं होतं.  आम्ही 850 चं डिझेल टाकून स्वत: गाडी केली आणि तिला इथे घेऊन आलो. मग हिंगोलीतल्या रुग्णालयात ॲडमिट केलं. पण तोपर्यंत उशीर झाला. कारण इथे आल्यावर आम्हाला डॉक्टर म्हणाले, ताई तुम्ही जर लौकर आला असतात तर तुमचं बाळ वाचू शकलं असतं.  पण तुम्हाला यायला  वेळ लागल्यामुळे  बाळ वाचलं नाही, असं त्यांनी सांगितल्याचं, महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group