सध्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होत आह. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या माहितीनुसार काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असल्याची माहिती आहे.
समोर आलेलय माहितीनुसार, गडचिरोली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. कारण गेल्या काही काळापासून काँग्रेसची लोकप्रियता कमी झाली आहे, सध्या पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न करत असताना गडचिरोलीत पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास मागील कार्यकाळात चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र ब्राह्मणवडे यांच्याकडे पक्षाच्या कारभार होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने अनेक जिल्हाध्यक्षांना पदावरून काढून टाकत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक केली होती. त्यामुळे गडचिरोलीचे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वजीत कोवासे यांची निवड करण्यात आली होती. मात्र ही निवड पदाधिकाऱ्यांना पटलेली नाही.
नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे जुने कार्यकर्ते व तालुकाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुंबई येथे भेट घेतली. आम्हाला जुना जिल्हाध्यक्ष हवा अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व दहा तालुक्यातील अध्यक्षांनी घेतली. यामुळे नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे सध्या गडचिरोली काँग्रेसमध्ये वातावरण तापलेले आहे. या नवीन निवडीचा निषेध करत तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत, मात्र प्रदेशाध्यक्षांनी हे राजीनामे अद्याप स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा जिल्हाध्यक्ष बदलला जाण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.मात्र जर गडचिरोलीसारखी नाराजी पक्षात असेल तर आगामी काळात पक्षाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.