हृदय पिळवटून टाकणारी घटना; आई-लेकीची भेट नियतीने कायमची हिरावली
हृदय पिळवटून टाकणारी घटना; आई-लेकीची भेट नियतीने कायमची हिरावली
img
Nandini khandare More

एक आई आपल्या मुलीच्या वाटेकडे डोळे लावून बसली पण तिला साधं तिचा मुलीशी शेवटचं बोलणंही नियतीला मान्य नव्हतं कदाचित. इथं एका महिलेचा आपल्या लेकीला भेटण्याआधीच मृत्यूनं गाठलं असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही मन पिळवटून टाकणारी घटना रत्नागिरीच्या दापोली परिसरात घडली आहे. 

आपली लेक मुंबईवरून गावी येणार, यामुळे आई मुलीच्या वाटेकडे आस लावून बसली होती. तिने लेकीला फोन करून 'कुठे आली? कधी पोहोचणार?' अशी विचारपूस केली. मुलीसाठी गोडधोड खाऊ घालण्याचा बेतही केला. मात्र लेकीच्या भेटीआधीच अनर्थ घडला आणि महिलेचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांपूर्वी आईनं कॉल करून विचारपूस केली होती, ती आई आता जगात नाही, ह्या विचाराने देखील मुलीच्या काळजात धस्स झालं.

शिल्पा सुरेश साळवी असं अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी मुंबईत वास्तव्याला असते. घटनेच्या दिवशी ती मुंबईहून आपल्या गावी आईला भेटायला येणार होती. मुलगी येणार म्हणून आईही आनंदी झाली. तिने आपल्या लेकीसाठी आमरस बनवण्याचा बेत केला. आंबे आणण्यासाठी त्या बाजारातही गेल्या. मात्र परत येत असताना दापोली खेड राज्य मार्गावर त्यांचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात शिल्पा यांचा जागीच मृत्यू झाला.

शिल्पा साळवी या दापोली येथील 'आर्यावर्त' येथे अनेक वर्षांपासून स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करत होत्या. शिल्पा यांची विवाहित मुलगी सध्या सुट्टीनिमित्त मुंबईहून दाभोळ येथे आली आहे. आपल्या लाडक्या लेकीची भेट होणार म्हणून शिल्पा खूप आनंदात होत्या. घरातून निघताना त्यांनी मुलीला फोन करून तिच्याशी संवाद साधला होता, तसेच तिच्यासाठी आवडीचे आंबेही विकत घेतले होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पोटच्या मुलीला केलेला तो फोन कॉल त्यांच्या आयुष्यातील अखेरचा कॉल ठरला.

अज्ञात वाहनाची धडक अन् जागीच मृत्यू

शिल्पा साळवी या जेव्हा रस्त्याने पायी जात होत्या, तेव्हा पाठीमागून आलेल्या एका वेगवान अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिल्पा या रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर शिल्पा साळवी काही वेळ अत्यंत गंभीर अवस्थेत रस्त्यावरच पडून होत्या. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिल्पा यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group