बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खान ला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, त्यानंतर बिग बॉस विजेता आणि स्टँडप कॉमेडियन याला देखील लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान आता लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून आता एका खासदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात अली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा माणूस असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानातून हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितले की, गोल्डी ब्रार यांनी त्यांना फोन करण्यास सांगितले होते. खासदार यादव झारखंड निवडणुकीत प्रचार करत आहेत. 24 डिसेंबरला पप्पू यादव यांचा वाढदिवस आहे. पण त्याआधीच त्यांना मारले जाईल असे फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे. धमकी देणारा व्यक्ती म्हणत आहे की, गोल्डी भाईने आपल्याला फोन करण्यास सांगितले आहे. रविवारीही त्याने फोन केला होता, मात्र पप्पू यादवने फोन उचलला नाही.
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा माणूस असल्याचे सांगून त्याने पाकिस्तानातून फोन करत पप्पू यादव यांना धमकी दिली आहे. गोल्डी ब्रारने त्यांना धमकी देण्यास सांगितल्याचे त्याने म्हटले होते. पप्पू यादव हे सध्या झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्यासाठी प्रचार करत आहेत. या दरम्यान त्यांना सतत जीवे मारण्याची धमकी येत आहे. याआधी नेपाळमधून फोन करून त्यांना धमकी देण्यात आल्याचे पप्पू यादव यांनी सांगितले होते.
दरम्यान , पप्पू यादव यांनी सांगितले की, गुन्हेगार वारंवार त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत होता. पण त्यांनी गुन्हेगाराला ताकीद दिली की त्याने आपल्याला पाहिजे तितकी रेकी करावी, परंतु आपल्या कुटुंबाला मध्ये आणू नये. त्यांचा लढा माझ्या विचारसरणीशी, सरकारी यंत्रणेशी असेल तर त्यांनी आम्हाला मारून टाकावे, असे ते म्हणाले. परंतु, जेव्हा कुटुंबाची चर्चा केली जाते तेव्हा त्याचे मार्ग वेगळे असतील. पप्पू यादव यांनी धमकीचा ऑडिओ सरकारला पाठवला आहे.
तसेच , काही काळापूर्वी पोलिसांनी महेश पांडे याला दिल्लीतून अटक केली होती, ज्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने त्यांना धमक्या दिल्या होत्या. मात्र, महेश पांडेचा लॉरेन्स बिश्नोईशी कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.