.. तर लॉरेन्स बिश्नोई संपूर्ण नेटवर्क संपवतो; ''या'' खासदाराची बिश्नोईला धमकी
.. तर लॉरेन्स बिश्नोई संपूर्ण नेटवर्क संपवतो; ''या'' खासदाराची बिश्नोईला धमकी
img
दैनिक भ्रमर

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  या हत्येची जबाबदारी  बिश्नोई गँगने घेतली. त्या संदर्भातील पोस्ट  बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात अली होती. दरम्यान या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.

केवळ सलमान खानच्या जवळचे असल्याने बाबा सिद्दीकी यांना बिश्नोई गँगने उडवलं आहे. त्यामुळे बिश्नोई गँगची दहशत निर्माण झाली आहे. असं असतानाच दुसरीकडे बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईलाच धमकी दिली आहे. तुरुंगात असलेला कवडीमोलाचा गुन्हेगार कधी मूसेवालाला मारत आहे, तर कधी करणी सेना प्रमुखाची हत्या करत आहे. आता त्याने बाबा सिद्दीकींना मारलं आहे. जर मला कायद्याने परवानगी दिली तर मी 24 तासात बिश्नोईचं नेटवर्क उद्ध्वस्त करून टाकेन, असा इशाराच पप्पू यादव यांनी दिला आहे.

पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी पोलीस व्यवस्थेवरही तोंडसुख घेतलं आहे. हा देश आहे की… एक गुन्हेगार तुरुंगात बसून आव्हान देत लोकांना मारत आहे. आपण मात्र मूकदर्शक बनून सर्व काही पाहत आहोत. कायद्याने माझे हात बांधले आहेत. नाही तर या गुंडाची संपूर्ण टोळीच मी अवघ्या 24 तासात उद्ध्वस्त करू शकतो. एक बदमाश तुरुंगात राहून एकामागोमाग एक गुन्हे घडवत आहे. अन् देशभरातील पोलीस हातावर हात ठेवून बसली आहे, ही अजबच परिस्थिती आहे, असा संताप पप्पू यादव यांनी व्यक्त केला आहे.





इतर बातम्या
Join Whatsapp Group