बिश्नोई गँग आणि डी-कंपनीमध्ये  गँगवॉरची शक्यता, पोलिसांनी घेतला ''हा'' निर्णय
बिश्नोई गँग आणि डी-कंपनीमध्ये गँगवॉरची शक्यता, पोलिसांनी घेतला ''हा'' निर्णय
img
दैनिक भ्रमर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची दहशत निर्माण झाल्याचे दृश्य आहेत. दरम्यान, मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये  बिश्नोई गँग आणि डी-कंपनीचे गुंड आहेत त्यामुळे जेलमध्ये गँगवॉरची शक्यता आहे. दरम्यान , संभाव्य गँगवॉरची शक्यता लक्षात घेऊन लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करण्याचा अर्ज जेल ऑथोरिटीने कोर्टात दाखल केलाय. या अर्जात बाबा सिद्दीकी आणि सलमान खानच्या घरावरील फायरिंग प्रकरणात अटक झालेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही सदस्यांना अन्य जेलमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.

जेल अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बिश्नोई गँगच्या सदस्यांची संख्या आता 20 पेक्षा जास्त झाली आहे. बिश्नोई गँगचे सदस्य जेलमध्ये आपला एक वेगळा गट बनवू शकतात, असा जेल ऑथोरिटीला संशय आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या बिश्नोई गँगसच्या गुंडांना अन्य जेलमध्ये शिफ्ट करण्यासाठी अर्ज केलाय. जेलमध्ये डी कंपनी आणि राजन गँगचे सुद्धा सदस्य आहेत.

दरम्यान , सध्या बाबा सिद्दीकी हत्याकांडातील 15 आणि सलमान खान फायरिंग केसमधील 5 जण जेल कस्टडीमध्ये आहेत. बाबा सिद्दीकी प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक झाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group