सलमाननंतर ''हा'' बिग बॉस फेम कॉमेडियन लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर, लिस्ट मध्ये आणखी कोण ?
सलमाननंतर ''हा'' बिग बॉस फेम कॉमेडियन लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर, लिस्ट मध्ये आणखी कोण ?
img
दैनिक भ्रमर
बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक खुलासे होत असून या घटनेनंतर सलमान खानला अनेक धमक्या मिळत आहेत.. सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली असून आता फक्त सलमान च नव्हे तर आणखी काही लोकं  लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टमध्ये कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावाला यांच्या नावांचा समावेश आहे. ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार मुनव्वरला गेल्या महिन्यात लॉरेन्स बिश्नोईच्या नावे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर त्याने त्याची सुरक्षा वाढवली होती. आता प्रत्येक सार्वजनिक स्थळी तो सुरक्षा रक्षकांसोबत दिसतो.

मुनव्वरवर असा आरोप आहे की त्याने हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवली होती. याच कारणामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते. हिंदू देवतांचा अपमान केल्याने लॉरेन्स बिश्नोई टोळी दुखावली गेली असल्याने मुनव्वरला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, मुनव्वरला धमकी मिळण्याचे मूळ कारण अद्याप उघड झालेले नाही.

त्याचबरोबर, श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावाला सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. त्याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि ते जंगलात नेऊन फेकले. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2022 पासून तो तुरुंगात कैद आहे. त्याच्या जीवाला असलेल्या धोक्याच्या भीतीने पूनावालाला सध्या तिहार तुरुंग क्रमांक 4 च्या एकाकी कक्षात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान , बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांना केलेल्या खुलाशानुसार पूनावाला हा बिश्नोई टोळीचा लक्ष्य असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातील एका अधिकृत सूत्राने सांगितले की, ‘आतापर्यंत आम्हाला लॉरेन्स टोळीकडून पूनावाला यांना कोणताही धोका असल्याची कोणतीही माहिती पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेली नाही. आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाल्यास आम्ही त्याच्या सुरक्षिततेचे पुनरावलोकन करू शकतो.’
इतर बातम्या
Join Whatsapp Group