अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात घुसला दुचाकीस्वार , आणि नंतर .... वाचा काय घडले
अभिनेता सलमान खानच्या ताफ्यात घुसला दुचाकीस्वार , आणि नंतर .... वाचा काय घडले
img
दैनिक भ्रमर
बुधवारी सलमान खानचा ताफा त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी जात असताना, एका दुचाकीस्वार मेहबूब स्टुडिओ आणि गॅलेक्सी अपार्टमेंटदरम्यान सुरक्षा ताफ्यात शिरला. याप्रकरणी  दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार बुधवारी घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

सलमान खानचा ताफा माहुब स्टुडिओजवळून जात असताना, 21 वर्षीय उझैर फैज मोईउद्दीन नावाच्या दुचाकीस्वाराने सलमान खानच्या कारजवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताकीदही दिली, मात्र तो सलमान खानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत राहिला. सलमान खान त्याच्या घरी पोहोचल्यावर पोलिसांच्या दोन वाहनांनी दुचाकीस्वाराचा पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी केली असता तो पश्चिम वांद्रे येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान , सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक धमक्या आल्या आहेत. या कारणास्तव त्याला Y+ सुरक्षा मिळाली आहे. यासोबतच मुंबई पोलिसही सलमानला सुरक्षा पुरवतात. या वर्षी एप्रिलमध्ये, सलमान खानच्या सुरक्षेबाबत गंभीर संकट आले होते जेव्हा दुचाकीस्वार नेमबाजांनी त्याच्या घर गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group