तारीख ठरली ! रश्मिका आणि विजयचा उदयपूरमध्ये होणार शाही विवाह
तारीख ठरली ! रश्मिका आणि विजयचा उदयपूरमध्ये होणार शाही विवाह
img
वैष्णवी सांगळे
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये एक खाजगी समारंभात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रांच्या उपस्थित साखरपुडा केला. माहितीनुसार , हा समारंभ अत्यंत साधेपणाने आणि पारंपारिक विधींनी पार पडला. आता अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. 

लग्नाबाबत या दोघांनी अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, त्यांचे शाही लग्न २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात होणार आहे.

अलिकडेच, तिच्या आगामी चित्रपट 'थामा' च्या प्रमोशन दरम्यान, एका मुलाखतीत रश्मिकाला साखरपुड्याच्या अफवांबद्दल विचारले असता, ती हसत म्हणाली, "सर्वांना माहिती आहे, बरोबर..." या उत्तरामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आणि #RashmikaVijayWedding सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. दरम्यान, विजयच्या टीमच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली की हे कपल पुढील वर्षी लग्नाची तयारी करत आहेत, पण तारखांबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group