रश्मिका-विजयच नाही, तर २०२६ मध्ये 'या' स्टार जोड्याही अडकणार लग्न बंधनात
रश्मिका-विजयच नाही, तर २०२६ मध्ये 'या' स्टार जोड्याही अडकणार लग्न बंधनात
img
वैष्णवी सांगळे
नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही ऑक्टोंबर २०२५ मध्ये खासगी पद्धतीने दोघांचा साखरपुडा झाला. हे कपल २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे एका शाही राजवाड्यात विवाह बंधनात अडकणार आहे. २०२६ मध्ये आणखी काही स्टार जोड्या लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्या नेमक्या कोणत्या जोड्या आहेत. जाणून घ्या. 

बॉलीवूडच स्टार कपल ऋतिक रोशन आणि सबा आजाद जवळपास 4 वर्षांपासून परस्परांना डेट करतायत. दोघांना अनेकदा वेकेशन आणि फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहण्यात आलय. सबा रोशन फॅमिलीच्या इवेंट्समध्ये दिसते. ही रोमँटिक जोडी 2026 मध्ये लग्न करण्याच्या प्लानिंगमध्ये आहे.

पॉपुलर एक्ट्रेस जान्हवी कपूर आणि बिजनेसमॅन शिखर पहाडिया जवळपास 3 वर्षांपासून परस्परांना डेट करतायत. दोघांना अनेकदा वेकेशन आणि फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र पाहण्यात आलय. त्यांनी जाहीरपणे आपलं नातं अजून कबूल केलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही जोडी वर्ष 2026 मध्ये लग्न करु शकते.

बॉलीवुड एक्ट्रेस कृति सेननची बहिण नुपुर सेनन आणि सिंगर स्टेबिन बेन पुढच्यावर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत. ही दोन्ही लग्न 11 जानेवारी 2026 रोजी उदयपूर येथे होणार आहे. अलीकडे कृतीने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये स्टेबिन सुद्धा होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group