दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांचा लग्नसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पडला. कुटुंबातील काही मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. तसेच केवळ जवळच्या मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात आले होते. पण लग्नाच्या तीन दिवसातच विजय आणि रश्मिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते 'आम्ही एकमेकांसाठी नाही' असे बोलताना दिसत आहेत. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची एक जाहिरात सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या जाहिरातीच्या शूटची झलक अभिनेत्रीनं शेअर केलेल्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. या जाहिरातीत, रश्मिका लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तर, विजय क्रीम रंगाच्या शेरवानीत देखणा दिसत आहे. दोघांमधील केमिस्ट्री उत्तम दिसत आहे. या जाहिरातीत दोघेही गाणे गाताना, एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. आम्ही एकमेकांसाठी बनलेलो नाही, असं म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर दोघेही - 'आपण एकमेकांसाठी बनलेलो आहोत', असं म्हणताना दिसत आहेत.
या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करताना रश्मिकाने तिच्या भावना कॅप्शनद्वारे व्यक्त केल्या, 'या जाहिरातीचा शूटिंग करताना आम्हाला सर्वात जास्त मजा आली. कारण सेटवर आम्ही दोघेच होतो. आम्ही तेच करत होतो, जे आम्हाला सर्वात चांगलं जमतं, ती गोष्ट म्हणजे.. मस्ती करणे.. कदाचित एकमेकांसाठी असणं, यालाच मेड फॉर इच अदर म्हणतात. ते आमच्यासारखे नव्हतं, कदाचित त्यामुळेच ते इतकं खास वाटलं. ही आमची छोटीशी कहाणी'. सध्या या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.