फ्लॉप की हिट? सिद्धार्थ मल्होत्रा- जान्हवी कपूरच्या 'परम सुंदरी' या चित्रपटाची पहिल्या दिवशी 'इतकी' कमाई
फ्लॉप की हिट? सिद्धार्थ मल्होत्रा- जान्हवी कपूरच्या 'परम सुंदरी' या चित्रपटाची पहिल्या दिवशी 'इतकी' कमाई
img
वैष्णवी सांगळे
बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा 'परम सुंदरी' हा चित्रपट  २९ ऑगस्टला रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते 'परम सुंदरी' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. चित्रपटावर प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक चित्रपटातील गाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा- जान्हवी कपूरच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

'परम सुंदरी' हा रोमँटिक कथा आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते. चित्रपटात हलकी-फुलकी कॉमेडी देखील पाहायला मिळत आहे. 'परम सुंदरी' ने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ७ कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला चित्रपट किती कोटींचा व्यवसाय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group