जान्हवी कपूर संतापली, म्हणाली तुम्हाला राग येत नाही का ? हिंदू तरुणाला...
जान्हवी कपूर संतापली, म्हणाली तुम्हाला राग येत नाही का ? हिंदू तरुणाला...
img
वैष्णवी सांगळे
८ डिसेंबरच्या रात्री बांगलादेशात हिंदू तरुण दीपू चंद्र दासची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्यावर इस्लामचा अपमान केल्याचा आरोप होता. या घटनेनं संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. अनेक जण सोशल मीडियावर राग व्यक्त करत आहेत. इतर देशांना नेहमी पाठिंबा देणारे बॉलिवूड सेलिब्रिटी आज बांग्लादेशमधील हिंदूंच्या हत्येवर गप्प का अशी अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तक्रार येत असते. दरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूर पुढे आली आहे. तिने स्टोरी शेअर करत घटनेचा निषेध केला आहे. 

जान्हवी कपूर काय म्हणाली ? 
"बांग्लादेशात जे घडत आहे ते अत्यंत अमानवी आहे. ही सरळसरळ कत्तल आहे आणि ही एकमेव अशी घटना नाही, नरसंहार आहे.  जर तुम्हाला या अमानुष मॉब लिंचिंगबद्दल माहिती नसेल, तर त्याबद्दल आधी वाचा, व्हिडीओ पाहा, प्रश्न विचारा. आणि हे सगळं पाहूनही तुमच्या मनात राग निर्माण होत नसेल, तर हीच ती ढोंगी वृत्ती आहे जी आपल्याला काही कळण्याआधीच नष्ट करेल. आपण जगाच्या दुसऱ्या टोकावर घडणाऱ्या घटनांवर हळहळ व्यक्त करत राहतो, पण आपल्या आजूबाजूला असलेले आपल्याच भाऊ-बहिणींना जिवंत जाळत असताना आपण गप्प राहतो."



जान्हवी पुढे म्हणाली,"जातीय भेदभाव आणि टोकाचा कट्टरपणा..आपण बळी असो वा गुन्हेगार या प्रत्येक स्वरूपाचा निषेध केला गेला पाहिजे, अन्यथा आपण आपली माणुसकीच विसरू. आपण एखाद्या अदृश्य रेषेच्या दोन बाजूंवर आहोत, असा भ्रम बाळगणारे प्यादे आहोत. हे ओळखा. स्वतःला ज्ञानाने सजग करा, जेणेकरून या सामुदायिक संघर्षात सतत गमावल्या जाणाऱ्या आणि दहशतीखाली जगणाऱ्या निरपराध जीवांसाठी तुम्ही ठामपणे उभे राहू शकाल." असं जान्हवीने म्हटलंय.

जान्हवी कपूरची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जणांनी या संवेदनशील मुद्द्यावर स्पष्टपणे भूमिका मांडल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group