मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
img
वैष्णवी सांगळे
एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण कोर्टाने ही फाशीची शिक्षा सुनावली. शेख हसीन सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध हा खटला चालवण्यात आला. 

बांगलादेशमध्ये सरकारविरुद्ध उफाळलेल्या जनक्षोभावेळी करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेवरुन शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील ICT न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशमधील टेलिव्हीजनवर या निकालाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 

माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका आंदोलन प्रकरणात दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सन 2024 साली बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता, त्यात आज न्यायालायने निकाल दिला. 2024 च्या या आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group