चित्रपटातील ''त्या''  दृश्यामुळे अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ ?नेमकं काय झालं ?
चित्रपटातील ''त्या'' दृश्यामुळे अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ ?नेमकं काय झालं ?
img
दैनिक भ्रमर
अभिनेता अल्लू अर्जुनाचा पुष्पा 2 या चित्रपटाने चांगलाच धुमाकूल घातला असून या सिनेमाने छप्पर फाड कमाई केली आहे. परंतु या चित्रपटाचा अभिनेता  पुष्पा 2’ रिलीज झाल्यापासून अडचणीत सापडला आहे.  हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या (4 डिसेंबर) संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी 13 डिसेंबरला या अभिनेत्याला ताब्यात घेतलं होतं. 

दरम्यान, अंतरिम जामिनावर बाहेर असलेला अल्लू अर्जुन आता नव्या अडचणीत सापडला आहे. एक मोठी कारवाई करत काँग्रेस नेते थेनमार मल्लान्ना यांनी अल्लू अर्जुनविरोधात नवी तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप घेत काँग्रेस नेत्याने गुन्हा दाखल केला आहे.

एका वृत्तपत्रात  प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन स्विमिंग पूलमध्ये लघवी करत असल्याच्या दृश्यावर काँग्रेस नेते थेनामर मल्लाना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दृश्यादरम्यान एक पोलीस अधिकारीही तिथे उपस्थित असतो. त्यांनी या दृश्याला ‘लज्जास्पद’ म्हटलं आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा आरोप केला.

निर्मात्यांवर कारवाईची मागणी केली अल्लू अर्जुनसह काँग्रेस नेत्याने चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार दाखल केली आहे. चित्रपट निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. थिनमार मल्लानाच्या तक्रारीमुळे आधीच एका प्रकरणात अडकलेल्या अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group