‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमियर शो 4 डिसेंबर रोजी पार पडला. हा शो हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पार पडला. यावेळी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यावेळी थिएटरमधील चेंगराचेंगरीत तिचा 8 वर्षांचा मुलगा देखील जखमी झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती.
या दुर्घटनेतील महिलेच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत करावी या मागणीसाठी अल्लू अर्जुनच्या घरावर हल्लाही करण्यात आला होता. मात्र आता यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. गुरुवारी निर्माते दिल राजू यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यातील संबंधांना चालना मिळावी यासंदर्भात होती.