हैदराबादच्या संध्या थिअटरमध्ये ‘पुष्पा 2: द रूल ‘ चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिला मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला अटक केली होती. 4 डिसेंबरला चित्रपटाच्या प्रिमियरवेळी हैदराबादमध्ये असलेल्या संध्या थिअरटरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन पोहोचला. त्यानंतर तीथे त्याच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली,गोंधळ उडाल्यानं चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.तर एक 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता.
आता या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनला मिळालेल्या जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी तेलंगणा पोलीस आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.अल्लू अर्जुन याचा जमीन रद्द झाला तर पुन्हा एकदा त्याची रवानगी जेलमध्ये होऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणात 13 डिसेंबरला अल्लू अर्जुला पोलिसांनी अटक केलं होतं. अल्लू अर्जुनला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर अल्लू अर्जुने आपल्या वकिलाच्या मदतीने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला जामीन मिळाला.त्याला चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी त्याला जामीन मिळाला, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्याला ती रात्र जेलमध्येच काढावी लागली, दुसऱ्या दिवशी त्याची सुटका झाली.