महाराष्ट्रावर 'शक्ती'चं संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणाला धोका
महाराष्ट्रावर 'शक्ती'चं संकट, चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणाला धोका
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. गेले दोन दिवस पाऊसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र महाराष्ट्रावर पुन्हा संकट येण्याची चिन्ह आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापुरात शेतकऱ्यांची शेती पाण्यात तर असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशात मान्सून परतीच्या प्रवासास कधी सुरुवात करणार याबद्दल हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस धोक्याचे ठरू शकतात. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ धडकणार आहे. या हंगामातील हे पहिलं चक्रीवादळ असून ते काल तीव्र झालं आहे. मात्र आज ते अधिक तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शक्ती चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; पोलीस जखमी

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यातून मान्सून माघारी कधी सुरु करणार याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, गुजरातमध्ये परतीचा पाऊस कोसळत असून तो मुंबईसह महाराष्ट्रात 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान बरसणार आहे. याचा अर्थ येत्या सोमवारी 6 ऑक्टोबरला पावसाचा परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

तर 12 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार जाणार असून दिवाळी पावसाशिवाय साजरी करता येणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा शक्यता आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group