''या '' 4 जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट ! गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन
''या '' 4 जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट ! गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन
img
दैनिक भ्रमर

गेल्या २ दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केला असून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आता राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देत, सावधगिरीचा इशारा दिला आहे . 

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली आहे. तर पुण्यातही मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group