२०२३ च्या अखेरचा दिवसाला अनेक जण नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत गुंग होते. त्याच दिवशी पंजाबच्या जालंधरमध्ये एका घरात कुटुंबातील पाच जणांचा मृतदेह सापडले आहेत. आर्थिक विवंचेनतून कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्जाच्या ओझ्याला कंटाळून पाच जणांनी आयुष्याची दोर कापली. पाचही जणांनी गळफास घेऊन जीवनप्रवास संपवला. मृतांमध्ये एक पुरुष, तीन महिला आणि एका तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे. पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आमदपूरमधील डरौली गावात ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदमपूरमध्ये मृत ५ जणांची ओळख पटली आहे. मनमोहन सिंह (५५), त्यांची पत्नी सर्बजीत कौर (५५), दोन मुली प्रभजोत ज्योत (३२), गुरुप्रीत कौर (३१), ज्योतीचा ३ वर्षांचा मुलगा अमन अशी या मृतांची ओळख पटली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस तपास उघड झालं की, ५५ वर्षीय मनमोहनने कुटुंबातील ४ जणांना संपवलं. त्यानंतर त्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. आर्थिक विवंचनेतून व्यक्तीने पाऊल उचलले असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. या प्रकरणाचा तपास जालंधर देहात पोलीस करत आहेत. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.
आदमपूरच्या डरौली खुर्द गावात ही घटना घडली आहे. मनमोहन सिंहचा जावई सर्बजीत सिंहने सांगितले की, काल मी सासरी फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र कोणीही फोन उचलला नाही. त्यानंतर रविवारी सायंकाळी घरी पोहोचलो तर घरात पाच जणांचे मृतदेह आढळले. या घटनेनंतर शेजारी लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. याला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिला नसला तरी कुटुंबाने आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मनमोह सिंह हा पोस्ट ऑफिसमध्ये काम करत होता. मनमोहन सिंहने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिलं की, २००३ साली पॉल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी ५ लाखांचं कर्ज घेतलं होतं. मनमोहनला व्यवसायात आर्थिक नुकसान झालं. गावातील एका व्यक्तीकडून व्याजावर कर्ज घेतलं होतं. त्याला घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचीच परतफेड करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे मनमोहन कर्जबाजारी झाला होता.