मैत्री म्हणावं की मूर्खपणा असा काहीसा प्रकार पुण्यात घडलाय. मुलांची जरा विचित्रच मैत्री पुण्यात दिसून आली. बरं यामुळे परिसरातील नागरिकांना देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. पुण्यात मंगळवारी रात्री बारा वाजता पाच जण पुण्याच्या धनकवडी परिसरात त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते.
ज्याचा वाढदिवस साजरा करायचा तो स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हता त्यामुळे आलेल्या मित्रांचा मात्र निराशा झाली मग काय मित्रांचा पारा अनावर झाला. या गोष्टीचा राग मनात धरून या तरुणांनी परिसरातील वाहनांवर याचा राग काढायला सुरुवात केली.
दारूच्या नशेत असलेले सर्व तरुणांनी जवळ आणलेल्या हत्यारांनी धनकवडी भागातील दुचाकी रिक्षा आणि चार चाकी यांच्या वर तोडफोड करायला सुरुवात केली ज्यामध्ये वाहनांचा मोठं नुकसान झालं. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. पुणे पोलिसांनी तात्काळ या घटनेचा गांभीर्य घेत या तरुणांना पकडण्यासाठी पदके रवाना केली आणि आज या पाच जणांना ताब्यात घेतलं. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.