आजचे राशिभविष्य !  ४ ऑगस्ट २०२५ आज सोमवारचा दिवस, आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी कसा असेल जाणून  घेऊया.
आजचे राशिभविष्य ! ४ ऑगस्ट २०२५ आज सोमवारचा दिवस, आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी कसा असेल जाणून घेऊया.
img
वैष्णवी सांगळे
दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. तुमचे आजचे राशिभविष्य कसे असेल जाणून घेऊयात. 

मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरीमुळे तुम्ही काळजीत असाल. तुम्हाला दुसरी नोकरीची ऑफर येऊ शकते, पण सध्याची नोकरी सोडू नका. पैसे वाचवण्यावर भर द्या. तुम्ही नवीन घर किंवा दुकान खरेदी करू शकता. जर कोणाला पैसे दिले असतील, तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.

वृषभ - वृषभ राशीच्या व्यक्तींचे आज मन थोडे अस्वस्थ असेल. कारण तुमच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू असतील. तुम्ही एखादी गोष्ट गुप्त ठेवली असेल, तर ती कुटुंबासमोर उघड होऊ शकते. प्रवासाला जाताना तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. दुसऱ्याच्या बोलण्यामुळे तुमचे काम बिघडू शकते. 

मिथुन - मिथुन राशीच्या व्यक्तींनो आज तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका. तुमच्या व्यवसायातील भागीदार तुम्हाला धोका देऊ शकतो. एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी लागेल.

कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध चांगले होतील, पण तुमच्या बॉसला तुमचे बोलणे आवडणार नाही, म्हणून महत्त्वाची माहिती कोणासोबत शेअर करू नका. घर आणि बाहेरच्या कामांमध्ये समतोल ठेवा. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.

सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींंना आज कामातील चुका सुधारून व्यवसायात वाढ करायची संधी मिळेल. दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते, पण कुटुंबातील एखाद्याच्या लग्नातील अडचणी दूर होतील. तुमच्या जुन्या चुकांमधून शिका.

कन्या - कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीसाठी उत्तम असेल. तुमची काम करण्याची क्षमता चांगली राहील. जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल, तर त्यात आराम मिळेल. तुम्हाला मनासारखे काम मिळण्याची शक्यता आहे. तुमची नवीन लोकांशी ओळख होईल, ही ओळख तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल.

तुळ - तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल. कामांमध्ये तुम्हाला तणाव जाणवेल. कारण व्यवसायात फायदा न झाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल. तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले, तर ते बुडू शकतात. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या, नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल. तुमच्या भावंडांसोबत तुमचे संबंध सुधारतील.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. कारण तुमच्या चांगल्या विचारांमुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला दुसरी चांगली संधी मिळू शकते.

धनु - धनू राशींच्या व्यक्तींना आज पैशांच्या व्यवहारात घाई करु नये. व्यवसायात विचारपूर्वकच पैसे गुंतवा, कारण कोणताही धोका घेणे हानिकारक ठरू शकते. जर कोणतीही कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देत असेल, तर ती दूर होईल. तुमच्या सहकाऱ्याशी बोलताना काळजी घ्या.

मकर - मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप धावपळीचा असेल. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. तुमच्या जुन्या चुकांमधून शिका. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासातील तणावातून आराम मिळेल, पण सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी मेहनत सुरू ठेवावी.

कुंभ - कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. जर तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन करून काम केले, तर ते चांगले राहील. तुम्हाला एकामागून एक आनंदाच्या बातम्या मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन - मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काही अडचणी घेऊन येईल, कारण तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. एखादे काम बिघडू शकते. नोकरीत तुम्हाला काही नवीन विरोधक मिळू शकतात. जर तुमच्या मुलांना अभ्यासात काही समस्या येत असतील, तर तुम्हाला त्यांच्या शिक्षकांशी बोलणे आवश्यक आहे. कोणत्याही नवीन कामात विचारपूर्वकच हात घाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group