२९ महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण सोडतीला सुरुवात, कल्याण–डोंबिवलीत मोठा ट्विस्ट
वैष्णवी सांगळे
मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत प्रक्रिया पार पडली. कल्याण-डोंबिवली सत्तेचा मोठा ट्विस्ट आहे. महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.