फळ विक्रीच्या आडून
फळ विक्रीच्या आडून "तो" करायचा गंभीर गुन्ह्यांची आखणी ; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
img
DB
कल्याण : कल्याणमध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात फळ विक्री करण्याच्या आडून गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार ठाण्याच्या पोलीस पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित इसमास ताब्यात घेतले असून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस देखील जप्त केले आहे.

कल्याणच्या बंदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत फळ विक्रेत्याच्या वेषात गुन्हेगारीचा डाव रचणारा सराईत सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे (वय ३०) असे या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सचिन हा फळ विक्रेता असल्याचे भासवून या व्यवसायाच्या आडून तो गंभीर गुन्ह्यांची आखणी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी पथकाने छापा मारून त्याला ताब्यात घेतले आहे.

संशयितास ताब्यात घेत गुन्हा दाखल

ठाणे शहराच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याणच्या बंदरपाडा परिसरात कारवाई करत सचिन शिंदे याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस यासह अटक केली आहे. यानंतर सचिन शिंदेवर शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर न्यायालयाने त्याला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group