रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. कल्याणमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दोघांना चिरडलं. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. कल्याण पश्चिमेच्या लाल चौकी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
हा ट्रक केडीएमसीचा असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या ट्रकच्या धडकेत एका महिलेचा आणि तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. महिला आपल्या मुलासह रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. निशा सोमेसकर आणि अंश सोमेसकर असं मृत आई आणि मुलाचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.