प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांची केंद्रिय स्वयंपाकगृहांना अचानक भेट; 2 बचत गटांना दिली कारणे दाखवा नोटीस
प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांची केंद्रिय स्वयंपाकगृहांना अचानक भेट; 2 बचत गटांना दिली कारणे दाखवा नोटीस
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी आज विविध महिला बचत गटांच्या केंद्रिय स्वयंपाकगृहांना अचानक भेट देवून सखोल तपासणी केली.

या भेटी दरम्यान श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, तुळजाभवानी महिला बचत गट.,  छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संख्या आणि द्वारकामाई महिला विकास बचार गट नाशिक यांच्या स्वयंपाकगृहाची संपूर्ण पाहणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील स्वच्छतेची स्थिती, धान्य व साठवणुकीची पध्दत, वापरले जाणारे तांदूळ तसेच सर्व संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यात आली. अटी व शर्ती प्रमाणे पोषण आहार जातो कि नाही याची विशेषतः पडताळणी करण्यात आली.

यावेळी २ बचतगटांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या असून संबंधित गटांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

तसेच सर्व बचतगटांना पुरक आहाराचे वाटप अटी व शर्तीप्रमाणे करावे अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे. खिचडीची प्रत्यक्ष चव घेवून गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला.

सर्व गटांना पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याबाबत तात्काळ सुचना देण्यात आल्या असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा दर्जात तडजोड अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित गटावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉ. चौधरी यांनी दिला.

महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उच्च दर्जाचा पोषण आहार व पुरक आहार देणे अनिवार्य आहे.
इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group