महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
ठाण्यातून नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला आधीत सुरूवात झाली असली तरी देखील महायुतीने या जागांवर आपले उमेदवार दिलेले नव्हते. आज त्या नावांची आज घोषणा झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र, त्यापैकी कोणत्याही नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, ठाण्यातून नरेश म्हस्के यांना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.