नाशिक शहरातील
नाशिक शहरातील "या" भागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाअंतर्गत सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून सुरु होणारी सातपूर, नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी ५०० मी. मी. व्यासाची पी. एस. सी. सिमेंटची गुरुत्व वाहीनीला मोतीवाला कॉलेज रोड येथे पाणी गळती सुरु असल्याने दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे.

यास्तव उद्या (दि.२३) या पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या पाणीपुरवठा होणार नाही तर रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

सातपूर विभागातील प्रभाग ८ मधील सावरकरनगर, नरसिंहनगर, दातेनगर, आनंदवल्ली, नवश्या गणपती मंदिर परिसर, बेंडकुळेनगर, गंगापूर गाव, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, सदगुरुनगर, सुयोग कॉलनी व काळेनगर परीसर  आदी भागात, प्रभाग ९ रामेश्वर कॉलनी, श्रमिकनगर परिसर, गंगासागरनगर, शिवाजीनगर, अहिल्याबाई होळकर चौक, धर्माजी कॉलनी, जिजामाता कॉलनी,  शिंदोरी रस्ता परीसर, कडेपठार चौक, छ. संभाजीनगर परीसर व धृवनगर परिसर आदी भागात, प्रभाग क्र. १० अशोकनगर जलकुंभ परीसर, जाधव संकुल, सुला चौक ते पपया नर्सरी चौक, मौले हॉल, अंबिका स्वीट मागील परिसर. 

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ मधील नहुष सोसायटी परिसर, माणिकनगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, डॉन बास्को, तिरुपती हाऊस परिसर, तेजोप्रभा कॉलनी,  श्रमिक कॉलनी परीसर, दादोजी कोंडदेवनगर, आयचितनगर, चैतन्यनगर, सहदेवनगर, पंपीग स्टेशन परीसर, गीतांजली सोसायटी, रामराज्य जलकुंभ परीसर, पुर्णवाद नगर, आकाशवाणी टॉवर परिसर, सुयोजित गार्डन परिसर, शांती निकेतन आदी परिसरात उद्या(दि.२३) पाणीपुरवठा होणार नाही, तर रविवारी (दि.२४) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांच्या या गैरसोयीबद्दल मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group