नाशिक :- मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्र व बुस्टर पंपींग स्टेशन येथे नाशिक स्मार्ट सिटी कंपनी येथे विविध विकास कामे करणे चालू आहे.
त्यानुसार नाशिक स्मार्ट सिटी कंपनी यांनी मनपाची विविध जलशुध्दीकरण केंद्रे येथे नवीन व्हॉल्व्स व फ्लोमीटर्स बसविणे, तसेच पाइपलाईनचे कामांकरीता शटडाऊनची मागणी केली आहे. ही कामे करण्याकरीता शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे.
त्यामुळे शनिवार दि. 21 जून रोजी संपूर्ण नाशिक शहरास पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच रविवार दि. 22 जून रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.