खळबळजनक ! रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटर स्फोटके, पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
खळबळजनक ! रेल्वे स्थानकात आढळली डिटोनेटर स्फोटके, पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर
img
Dipali Ghadwaje
कल्याण रेल्वे स्थानकावरून धक्कादायकबातमी समोर आली  आहे. कल्याण रेल्वे स्थानकावरील एक नंबर प्लॅटफॉर्मवर डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. एका बॉक्समध्ये एकूण ५४ डिटोनेटर स्फोटके आढळले आहेत. पोलिसांना फोन आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या वृत्तानंतर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर एस्केलेटरच्या शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर सापडल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांना फोन आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर दोन बॉक्स आढळले . या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली.  

बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर हे डिटोनेतर ताब्यात घेतले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. वर्दळीच्या वेळी ही घटना समोर आल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या रेल्वे पोलीस ,बॉम्बशोधक पथक, कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर स्फोटके कोणी आणले ,कधी आणले , रेल्वे स्थानकावर का ठेवले याचा तपास आता पोलीस करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group