'याठिकाणी' महायुती फिस्कटली, दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
'याठिकाणी' महायुती फिस्कटली, दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
img
वैष्णवी सांगळे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र महायुती, महाविकास आघाडीचा घोळ अद्यापही कायम आहे.निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे, राजकीय पक्षाचे नेते उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महायुती, महाविकास आघाडीचा घोळ अद्यापही कायम आहे. 



काही जिल्ह्यात मात्र महायुतीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड, जळगाव या जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीत, त्यामुळे युती होऊ शकली नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. 

यापूर्वी, मंत्री नितेश राणे यांनीही याबाबत माहिती देताना स्वबळाची तयारी असल्याचे म्हटले होते. आता, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे पुढील १० दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करत अर्ज देखील भरावे लागणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group