फडणवीस सरकारने मंत्रिमंडळात संधी न दिल्याने अनेक नेते नाराज असल्याचे पाहायला मिळते. अशात 'मंत्रिपद न दिल्याने मी नाराज नाही', असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.
नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर ?
"मी साईबाबांचा भक्त आहे. ते माझं मंत्रिपद ठरवत असतात. मी मंंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत" असे केसरकर यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे.
माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाबाबत सूचक विधान केले. त्यांनी "मला मंत्रिपद मिळू नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. मी साईबाबांचा भक्त आहे. मी मंत्रिपदापेक्षाही मोठ्या पदावर जाईन. माझे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. माझी तेथे चांगली ओळख आहे", असे म्हटले आहे.