राज्यातील घडामोडींना वेग आला असून सध्या राज्यातील बडे नेते अनेक मुद्द्यांवर आपले मतं मांडताना दिसत आहेत. दरम्यान, आता महाराष्ट्रातील मत्स व बंदरे खात्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीये. सध्या उन्हाळा आलाय. तुम्ही रुह अफजा पिता की गुलाब शरबत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच उत्तर देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, मी गोमूत्र फार पितो. मी तुम्हाला सांगतो ते आरोग्यासाठी फार चांगलं असतं.
नितेश राणे म्हणाले की, गुलाब आणि रुह अफजा मला कोण देत? याच्यावर बरचं काही डिपेंड आहे. मी रुह अफजा वगैरे पित नाही. रुह अफजा देणारा माणूस कोण त्यावर ते अवलंबून आहे. रुह अफजा मला कोणीही चांगल्या भावनेने पाजणार नाही. तुम्ही विचार करा रुह अफजा नितेश राणेला कोण देईल? तो फार गोड असतो मला आवडत देखील नाही.