बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता राखली आहे. या निकालांमुळे राज्यात एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी, संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मुख्यमंत्रीपदावर नितीश कुमार यांचाच दावा केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. बिहारचा पहिल निकाल हा एनडीएच्या बाजूने लागला आहे. एनडीएच्या जनता दल यूनायटेडचे उमेदवार महेश्वर हजारी यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.