नेपाळ मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आज (दि.24) सौर्य एअरलाइन्सचे विमान टेकऑफ दरम्यान क्रॅश झाले आहे, अशी माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. हे विमान कांठमांडूहून पोखराकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातावेळी विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण होते. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपाचळीवर सुरू करण्यात आले आहे.
या विमानात 19 प्रवासी होते त्यापैकी 15 जण ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या विमानाने पेट घेतल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भाती व्यक्त होत आहे. हे विमान काठमांडू वरुन पोखरा येते जात होते. या टेकऑफ दरम्यान हे विमान धावपट्टीवर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले.’
सौर्य एअरलाईन्सचे विमानाने सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोखराकडे उड्डान भरले होते. मात्र, उड्डाण भरतानाच अचानक विमान क्रॅश झाले. अपघातवेळी विमानात क्रू मेंबर्ससह 19 जण प्रवास करत असल्याचे वृत्त नेपाळच्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या भीषण अपघातात जीवितहानी झाली आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.