आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ अझरबैजान या देशाचे विमान कोसळले. अपघात घडला, त्यावेळी विमानात 105 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. रशियातील वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे.
कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयानुसार, अझरबैजानचे विमान बाकू येथून ग्रोन्जी येथे जात होते. विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , हे विमान, धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसत आहे. हे विमान इतके तिरपे झालेले दिसते की ते जणू थेट जमिनीवर येऊन आदळेल. पण थोड्याच वेळात ते उतरत असताना धावपट्टीजवळ जमिनीवर येऊन आपटले. त्याचवेळी मोठा आवाज झाला. मोठ्या आवाजाने रहिवाशी किंचाळत असल्याचा आवाज येतो. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे या दृश्यात दिसते.
ग्रोन्जी हे रशियातील चेचन्या या प्रदेशात येते. दाट धुकं असल्याने वेळेवर हे विमान ग्रोन्जी विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
एका न्यूज पोर्टलने या विमान अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडलवर या दुर्घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या विमानात 105 प्रवासी असल्याचे समोर येत आहे. तर 5 विमान कर्मचारी असल्याची एक माहिती समोर येत आहे. या प्रवाशांमध्ये अझरबैजान आणि रशियाचे नागरीक होते.
अझरबैजान एअरलाईन्सने या अपघातसंबंधी माहिती दिली आहे. त्यानुसार, हे अँम्बेअर 190 विमान होते. त्याचा क्रमांक J2-8243 असा होता. बाकू ते ग्रॉन्जी या शहरादरम्यान त्याची सेवा होती. पण दाट धुक्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते अकातूकडे वळवण्यात आले. अकातू विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, विमानतळाच्य तीन किलोमीटर परिसरात ते कोसळले.
हे विमान, धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसत आहे. विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात ते कोसळले. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे दिसते.