मोठी बातमी ! पुन्हा विमान अपघात, हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं
मोठी बातमी ! पुन्हा विमान अपघात, हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं
img
Vaishnavi Sangale
अहमदाबाद विमान दुर्घटनेतुन अजूनही अनेक लोक सावरलेले नाहीत. त्यात आणखी विमान दुर्घटना घडली आहे. ही दुर्घटना बांगलादेशची राजधानी ढाका येथे घडली आहे. ढाका शहरातील एका कॉलेज कॅम्पसमधील इमारतीवर हवाई दलाचं विमान कोसळलं आहे. बांग्लादेश हवाई दलाचं हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होतं. 

या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान कोसळल्यानंतर कॉलेज कॅम्पसमधील एका इमारतीला धडकलं. त्यानंतर मोठी आग लागली. यात कॉलेजमधील सहा ते सात विद्यार्थी गंभीररित्या होरपळले आहेत. या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. 

बांगलादेशाच्या हवाई दलाचं ट्रेनिंग जेट F-7 BJI विमान हे माइलस्टोन शाळा आणि कॉलेज कॅम्पस परिसरात कोसळलं.विमान शाळा परिसरात कोसळल्याने इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. विमान कोसळल्याच्या घटनेनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group