वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान आहे. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात 60 प्रवासी होते. हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं.
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन नॅशनल विमानतळाजवळ एका अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची हेलिकॉप्टरची हवेत धडक झाली. या धडकेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोन्ही तुटून नदीत पडले. आतापर्यंत नदीतून 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , विमान विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. विमान उतरवत असताना समोरून येणाऱ्या अमेरिकन आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरशी त्याची टक्कर झाली. यानंतर दोन्ही क्रॅश होऊन पोटोमॅक नदीत पडले. ज्या हेलिकॉप्टरशी विमानाची टक्कर झाली ते सिरोस्की H-60 हेलिकॉप्टर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हे एक छोटे प्रवासी विमान होते, ज्याची आसन क्षमता ६५ होती. अपघाताच्या वेळी विमानात ६० प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. हे विमान कन्सासहून वॉशिंग्टनला येत होते.
एअरलाइन कंपनीने एक निवेदन जारी करत सांगितलं की, आम्हाला ही बातमी मिळाली आहे की PSA द्वारे संचालित अमेरिकन ईगल फ्लाइट ५३४२ कन्सासहून वॉशिंग्टन रीगन राष्ट्रीय विमानतळावर येत होते. ते क्रॅश झाले आहे.
अमेरिकेचे सिनेटर टेड क्रुझ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या घटनेत काही जण मृत्युमुखी पडले आहेत पण विमानात किती लोक होते हे अद्याप आम्हाला माहित नाही. दरम्यान, विमानतळावरील विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे.