हवाई प्रवास हा सुरक्षित मानला जातो. पण गेल्या काही महिन्यापासून विमानाचे वाढते अपघात पाहता हा प्रवास सर्वात असुरक्षित प्रवास मानला जात आहे. गुजरात अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही सेकंदात कोसळलं होतं. यात 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता , त्यानंतर तर प्रत्येक भारतीयालाच धडकी भरली होती. त्यानंतरही जगभरातून विविध विमान अपघाताच्या घटना समोर येताच आहे.

आज हाँगकाँगमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. सोमवारी हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कार्गो म्हणजे मालवाहू विमान धावपट्टीवरुन घसरलं व थेट समुद्रात जाऊन कोसळलं. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.हे विमान तुर्कीची मालवाहतूक करणारी एअरलाइन कंपनी एसीटीचं होतं. स्थानिक मीडियाने हे वृत्त दिलं आहे.
एमिरेट्सच हे विमान EK9788, बोइंग 747-481, स्थानिकवेळेनुसार, जवळपास 03:50 मिनिटांनी (19:50 GMT) दुबईवरुन येत होतं. धावपट्टीवर एका वाहनाशी या विमानाची टक्कर झाली. विमानतळावरील दोन ग्राऊंड स्टाफ समुद्रात पडले असं सिविल एविएशन डिपार्टमेंटकडून सांगण्यात आलं आहे. समुद्रात पडलेल्या ग्राऊंड स्टाफमधील दोघांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवलं, तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक मिडिया तसच सार्वजनिक प्रसारक आरटीएचके यांनी पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
विमानातून प्रवास करणारे चालक दलाच्या चार सदस्यांचे प्राण वाचले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे.ज्या रनवे वर ही दुर्घटना घडली तो बंद करण्यात आला आहे. पण विमानतळावरील दोन धावपट्ट्या सुरु आहेत. एअरपोर्ट प्रशासन या प्रकरणात लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे. हाँगकाँगच्या सरकारी उड्डाण सेवेने प्रभावित रनवे च्या वर हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत,स्थानिक मिडिया रिपोर्ट्समधून ही माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडच्या बोटी सुद्ध मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत.