मुंबईत खासगी विमान कोसळले, खराब हवामानामुळं विमानतळावरच अपघात
मुंबईत खासगी विमान कोसळले, खराब हवामानामुळं विमानतळावरच अपघात
img
Dipali Ghadwaje

मुंबई : मुंबई  विमानतळावर खासगी विमानकोसळल्या ची घटना घडली आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमधून प्रवास करत असलेल्यांपैकी तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.  ही दुर्घटना इतकी भीषण होती की, या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्ससह 8 जण प्रवास करत होते.

हे खासगी विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईकडे येत होतं. मुंबईत सुरु असलेल्या तुफान पावसामुळे सध्या खराब हवामान आहे. विमानाचं जेव्हा लँडिंग होत होतं, त्यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे खासगी विमान कोसळलं आणि भीषण दुर्घटना घडली.

8 प्रवासी करत होते विमानातून प्रवास
VSR Ventures Learjet 45 हे विमान अपघातग्रस्त झाले आहे.  VT-DBL ऑपरेटिंग फ्लाइट विशाखापट्टणम ते मुंबई असे उड्डाण करत होते. हे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टी क्रमांक 27 वर उतरत असताना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर हे विमान कोसळले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स एकूण 8 जण प्रवास करत होते. विमान लँडिंग करत असताना अतिवृष्टीसह दृश्यता 700 मीटर होती. यामुळे खराब हवामानामुळेच विमान कोसळ्याची माहिती समोर येते.  आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group