भारतीय हवाई दलाचे UAV विमान कोसळले
भारतीय हवाई दलाचे UAV विमान कोसळले
img
दैनिक भ्रमर
भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

जैसलमेरच्या पिठाळा भागात तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला मोठी आग लागली आहे, त्यामुळे ते जळून राख झाले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही.

पोलिस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, ते टोही विमान असू शकते. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी परमवीर सिंग रावलोत यांनी सांगितले की, हे विमान पडले तेव्हा आम्ही ट्यूबवेलवर बसलो होतो. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि भारतीय हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group