T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा धक्का ; टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून मथीशा पथिराना बाहेर
T20 World Cup 2026 : श्रीलंकेला मोठा धक्का ; टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून मथीशा पथिराना बाहेर
img
वैष्णवी सांगळे
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धेचं यजमानपद असलेल्या श्रीलंकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. दरम्यान श्रीलंकेला या फेरीपूर्वी मथीसा पथिरानाच्या रुपाने धक्का बसला आहे. पथिराना ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त झाला. त्यामुळे पहिलं षटकंही पूर्ण टाकू शकला नव्हता. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. रिपोर्टनुसार, पथिराना तीन आठवडे मैदानात उतरणार नाही. 

मिडिया रिपोर्टनुसार, मथिशा पाथिरानाचे स्कॅनिंग झाले असून रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. पण पाथिराना दुखापतीमुळे तीन आठवड्यांपर्यंत बाहेर राहण्याची शक्यता आहे. पण दुखापत लवकर बरी झाली नाही तर तो आयपीएल 2026 मधूनही बाहेर पडू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सने पथिरानासाठी मिनी लिलावात मोठी बोली लावली होती. त्याला 18 कोटी रुपयात खरेदी केले होते. जर पाथिराना तंदुरुस्त झाला नाही, तर त्याचा कोलकाताच्या रणनीतीवर मोठा परिणाम होईल. आधीच कोलकाताने मुस्तफिजूर रहमानला वगळले आहे आणि हर्षित राणा देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group