टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात भारताने द. आफ्रिकेविरुद्ध पहिली बाजी जिंकली आहे. भारताने टॉस जिंकला असून त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया कोणत्याही बदलाशिवाय या सामन्यात उतरत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.
बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फायनल सामना शनिवार 29 जून रोजी रात्री 8 वाजता सुरु झाला. या सामन्याचा टॉस टीम इंडियाने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर साऊथ आफ्रिकेला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले आहे.
सलामी फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा अवघ्या 5 बॉलवर 9 धावा करून बाद झाला. तर त्याच्यानंतर आलेला रिषभ पंत सुद्धा शून्य धावा करून बाद झाला. रोहित आणि रिषभ पंत हे दोघे केशव महाराजच्या बॉलिंगचे शिकार ठरले. केशव महाराजने टाकलेल्या बॉलिंगवर रोहित आणि रिषभ हे कॅच आउट झाले. यानंतर आलेला सूर्यकुमार यादव हा विराट सोबत उभा राहून धावा करेल असे वाटत असताना सूर्यकुमार देखील अवघ्या 3 धावा करून बाद झाला. यावेळी टीम इंडियाची धावसंख्या 5 ओव्हरला 34 धावा आणि 3 विकेट्स अशी होती.
असे आहेत दोन्ही संघाचे ११ खळाडू
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.